Description
⭐गणेश याग /यज्ञ ही पूजा का करावी??
⭐भक्तगण गणेशयाग/यज्ञ या पूजे द्वारे आपल्या जीवनातील समस्या अडीअडचणी दूर करून सुख समृद्धीचा मार्ग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात
ही पूजा गणपती बाप्पांच्या प्रसन्नतेसाठी आहे
⭐गणपती बाप्पा यांची पूजा ज्ञानाचे कारक,विघ्नहर्ता: सर्व विघ्नांचे हरण करण्यासाठी, म्हणून पूजन केले जाते
गणेश याग ही पूजा कशी केली जाते ??
⭐या पुजेमध्ये गणपती पूजन ,पुण्याह वाचन ,मातृका पूजन , वास्तु मंडल ,योगिनी मंडल ,क्षेत्रपाल मंडल . ब्रम्ह मंडल ,सर्वतोभद्र मंडल पूजन ,नवग्रह पूजन ,रुद्र पूजन अशी पूजा मांडणी केली जाते
⭐या पूजेमध्ये मोदकांच हवन खूप महत्त्वाच आहे
⭐सिद्धी बुद्धी सहित महागणपती म्हणून गणपती बाप्पांचे सोडश उपचार म्हणजे 16 विविध प्रकारची पूजा, विविध द्रव्याने करून गणपतींना स्थापित केले जाते
ही पूजा कधी करावी??
⭐गणेश याग ही पूजा मंगळवारी , माघी विनायक चतुर्थी,अंगारक योगावर, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी, विनायक चतुर्थीच्या दिवशी किंवा शुभमुहूर्तावरती करावे
ही पूजा कुठे करावी??
⭐गणपती मंदिरामध्ये,घरामध्ये किंवा शुभ ठिकाणी गणेश याग ही पूजा करावी
⭐गणेश याग ही पूजा किती दिवसांचे आहे ??
⭐ही पूजा एक दिवस किंवा तीन दिवस अशाप्रकारे करता येतो
गणेश याग पूजा मध्ये कसला प्रसाद / नैवेद्य असतो ??
⭐ह्या पूजा मध्ये मोदकांचा नैवेद्य/ प्रसाद असतो
⭐या गणेश याग पुजे मध्ये मुख्य करून विशेषतः मोदकांचा प्रसाद वितरण केला जातो
⭐पूजेनंतरुन सर्वांच्या मनोकामनासाठी विशेष अर्घ्य ही पूजा विशेष करून केली जाते यामध्ये मनोकामना देवाला सांगितली जाते
⭐गणेश यागाचे फायदे
⭐बुद्धिमत्ता आणि ज्ञानात वाढ : गणेश हे ज्ञानाचे दैवत आहे यामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञानामध्ये वाढ होते
⭐मानसिक शांती : यात मानसिक शांती भेटून ताण तणाव कमी होण्यास मदत होते
⭐सर्व विघ्ने दूर करणे :गणेश यागा मुळे जीवनातील विघ्नही दूर होतात सुख शांती मिळते घरातील कार्य सुखरूप पार पडतात आरोग्य चांगलं मिळत
⭐सुरक्षितता आणि संरक्षण : या यागामुळे जीवनात व्यापार,नोकरी ठिकाणी धोके कमी मिळतात स्थिरता भेटण्यास मदत होते अस्थिरता कमी होते
⭐गणेश याग हे अतिशय पवित्र आणि महत्वपूर्ण अनुष्ठान आहे हे अष्टविनायकाच्या प्रसन्नतेसाठी केले जाते
हे शक्तिशाली अनुष्ठान जीवनामधील प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे









Reviews
There are no reviews yet.