Description
आपण ज्या ठिकाणी राहतो , आपण ज्या ठिकाणी business करतो, किंवा ऑफिसमध्ये नकारात्मक ऊर्जा, किंवा हॉस्पिटलमध्ये नकारात्मक ऊर्जा,त्या ठिकाणी भरभराटी होत नसेल, सतत आजारी पण आपल्या घरात असेल आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी दत्तयाग ही पूजा केली जाते, आपण बाधित घरात मध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला भरभराटी बघायला भेटणार नाही आणि विचित्र अनुभव त्या ठिकाणी आपल्याला येतात. पैसा येतो पैसा टिकत नाही ,सुख शांती नाही ,भरभराटी नाही ,मतभेद , मतभिन्नता अशा ठिकाणी दत्तयाग करन खूप महत्त्वपूर्ण आहे.
दत्त याग
दत्तयाग कधी करावा??
दत्त याग ही पूजा गुरुवारी ,दत्त जयंतीला, मार्गशीर्ष महिन्यात किंवा शुभ दिवशी केली जाते.
दत्तयाग कुठे करावा?
दत्त याग ही पूजा आपल्या घरामध्ये, दत्त मंदिरामध्ये किंवा आपल्या बिल्डिंग अपार्टमेंट किंवा यज्ञशाळा मध्ये करता येतो. विशेषतः, दत्तात्रेयांचे मंदिरे किंवा तीर्थक्षेत्रे याठिकाणी याग करणे अधिक फलदायी मानले जाते.
दत्त याग म्हणजे दत्तात्रेय भगवानाची पूजा आणि यज्ञ होय. हा यज्ञ दत्तात्रेयांच्या भक्तांनी त्यांच्या कृपेसाठी आणि आशीर्वादासाठी केला जातो. दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या गुणांचा संगम आहे. दत्त यागाचा उद्देश मानसिक शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती साधणे हा आहे.
दत्त याग का करावा?
दत्त याग केल्याने अनेक फायदे होतात:
मानसिक शांती: यागाच्या माध्यमातून मन शांत आणि स्थिर होते.
आध्यात्मिक प्रगती: आत्म्याची प्रगती होते आणि भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची प्राप्ती होते.
समृद्धी: आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळते.
रोगमुक्ती: शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्तता मिळते.
विघ्नांचे निवारण: जीवनातील अडचणी आणि विघ्नांचे निवारण होते.
दत्त याग कोणी करावा?
दत्त याग कोणताही भक्त करु शकतो, जे भगवान दत्तात्रेयावर श्रद्धा आणि भक्ती ठेवतात . विशेषतः, जे लोक मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक अडचणीत आहेत, त्यांनी हा याग करावा.
दत्तयाग ही पूजा का करावी??
1 . जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी
1 . बाहेरीक बाधा ,नकारात्मक बाधा दूर होण्यासाठी
- दत्तप्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी
- दत्तात्रेय देवता प्रसन्न होण्यासाठी
दत्त याग कधी करावा?
1 .दत्त याग करण्यासाठी काही विशिष्ट दिवस किंवा तिथी असतात:
2.गुरुवार: गुरुवार हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा मानला जातो, त्यामुळे हा याग गुरुवारी करणे श्रेयस्कर आहे.
3.दत्त जयंती: मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती असते, त्या दिवशी याग करणे अत्यंत शुभ मानले जाते.
4.पौर्णिमा: प्रत्येक पौर्णिमेला हा याग करणे फलदायी असते.
दत्तयागाची फलश्रुती
दत्त यागा मुळे काम, क्रोध ,लोभ, मोह, मत्सर,दंभ ,अभिमान हे सर्व रिपू कमी करता येतात. दत्त याग ही खूप मोठी प्रभावी साधना आहे. म्हणून संपूर्ण विधी शास्त्रोक्त पद्धतीने करायला पाहिजे.यासाठी तज्ञ गुरूंजींची गरज आहे
आपल्यातील दुर्गुणता कमी व्हावी, आपले पाप कर्म कमी व्हावे, दत्तात्रेय प्रभूंचे आशीर्वाद आपल्याला मिळावे, आपली सद्भक्ती दत्तात्रेय प्रभूंच्या चरणाला मिळावी म्हणून सुद्धा दत्त याग केला जातो. यालाच दत्त यज्ञ असं सुद्धा संबोधलं जातं.
धार्मिकता याकडे आपलं लक्ष लागावं, मन वळावं ,म्हणून सुद्धा दत्तयाग केला जातो . हे एक खूप महत्त्वपूर्ण अनुष्ठान आहे.
दत्त प्रभूंच्या कृपेने आध्यात्मिक प्रगती प्राप्त होऊन सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा दत्त याग केला जातो
दत्त यागाचे फायदे
1 . अध्यात्मिक शांती: दत्तयाग या पूजेने आध्यात्मिक शांती प्राप्त होते
2.अध्यात्मिक प्रगती: साधकाच्या जीवनात अध्यात्मिक प्रगती प्राप्त होण्यासाठी खूप मदत होते
3.आरोग्य सुधारणा: चांगलं आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते
- कौटुंबिक सुख: कुटुंबामध्ये शांती आणि एकता नांदते
दत्त याग विधि
1 . संकल्प : दत्त याग सुरू करताना संकल्प घेऊन पूजेला सुरुवात केली जाते
2.गणेश पूजन: गणपतीची पूजा सुरुवातीला केली जाते
3.कलश स्थापना: शुद्ध जलाने कलश स्थापना करून कलश अभिमंत्रित केला जातो
- मंत्रजप: दत्तप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी काही विशिष्ट मंत्रांचा पठन गुरुजीं द्वारे केले जातो
5.अग्निस्थापन: अग्नी देवतेला आवाहन करून यज्ञ स्थापना केली जाते
6.हवन: यामध्ये दत्तमाला मंत्रांच हवन केले जाते
7.समाराधना: देवाला नैवेद्य दिला जातो . आरती केली जाते. देवाची प्रार्थना केली जाते .देवाला मनोकामना सांगितली जाते
दत्त यागातील महत्वाची पूजा
दत्त याग या पूजा मध्ये महत्त्वाची पूजा दत्तप्रभूंना महा अभिषेक स्नान केले जाते
नंतरुन सोडश उपचार पूजा केली जाते
यामध्ये वास्तुमंडल ,योगिनी मंडल, क्षेत्रपाल मंडल ,सर्वतोभद्र मंडल, (दत्त भद्र मंडल ),नवग्रह मंडल ,रुद्र मंडल , ही पूजा देखील केली जाते
दत्त याग या पूजा मध्ये अर्चन हा एक महत्त्वाचा विधी आहे ज्यामध्ये हिरण्य अर्चन, पंचखाद्य अर्चन, चंदन अर्चन अशा विविध पद्धतीने अर्चन पूजा केली जाते
दत्त यागाचे महत्व काय?
दत्त यागाचे महत्व हे भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची प्राप्ती, आध्यात्मिक उन्नती आणि सर्वांगीण विकास होय . हा याग केल्याने भक्तांचे जीवन समृद्ध आणि शांत होते, तसेच त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होतात.
दत्त याग एक अत्यंत पुण्यकारक आणि फलदायी उपाय आहे जो भक्तांचे जीवन सुखमय आणि समृद्ध करतो. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीने हा याग केल्यास नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतात.
महत्त्वाच्या गोष्टी
हे पूजा करताना शुद्धता आणि पवित्रता असणं गरजेचे आहे
या पूजेसाठी तज्ञ गुरुजी अनुभवी मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन खूप गरजेच आहे
दत्त यागाने साधकाला शांती, भक्ती अध्यात्मिक कीर्ती यांचा अनुभव नक्कीच प्राप्त होतो हा यज्ञ करून दत्तप्रभूंना प्रसन्न करण्यास मदत होते आणि दत्तात्रय भगवान सदैव भक्तांच्या रक्षणासाठी या पूजेने प्रसन्न होवून आशीर्वाद स्वरूपी वरदान देतात
Reviews
There are no reviews yet.