Chandi Yag / चंडीयाग

Call for Price

Availability: In Stock

⭐चंडीयाग हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूप शक्तिशाली धार्मिक विधी आहे ,याच्यामध्ये विशेषतः कुलस्वामिनी ची पूजा केली जाते ,चंडीयाग ही पूजा कुलस्वामिनीच्या उपासनेसाठी केली जाते, या पूजेमुळे देवीला प्रसन्न करण्यास मदत होते , या पूजेमुळे आपल्या मनातील मनोकामना धन कामना अशा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत भेटते ,ह्या पूजेमध्ये विविध देवीच्या रूपांची पूजा केली जाते जसे की 64 योगिनी आहेत 16 मातृका आहेत यंत्र देवता आहेत पीठ देवता आहेत या स्वरूपाची पूजा केली जाते, यासोबत या पूजेसाठी काही ग्रंथांमध्ये देवीच्या महिमांच  वर्णन सुद्धा आलेला आहे, यामध्ये प्रामुख्याने सप्तशती हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे, यामध्ये  देवीची विविध प्रकारची स्तुती आलेली आहे, आणि या स्तुतीमुळेच आपल्याला देवीला प्रसन्न करण्यासाठी खूप मदत भेटते

Categories: ,

Description

⭐ह्या पूजेचे फायदे

1) सर्वांगीण कल्याण : या पूजेमुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवून सर्वांगीण कल्याण होण्यासाठी हा याग  केला जातो

2)आरोग्य लाभ : हा याग केल्यामुळे चांगला आरोग्य आयुष्य प्राप्त होते आरोग्य विषयी समस्या कमी होण्यास मदत होते

3) धन समृद्धी : आपल्याला आपल्या जीवनात धन, लक्ष्मी, पैसा, समृद्धी, भरभराटी या गोष्टी प्राप्त होण्यास मदत होते

4) मनोकामनापूर्ती : या पूजेमुळे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते

5) म्हणून बहुतांश लोक चंडीयाग ही पूजा प्रत्येक वर्षी आपल्या घरी करतात

 

⭐ही पूजा कुठे करावी??

ही पूजा मंदिरामध्ये घरामध्ये किंवा शुभ ठिकाणी केली जाते

 

⭐ही पूजा कधी करावी??

ही पूजा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा अष्टमी चतुर्दशी किंवा अग्नी देवतेचा वास पृथ्वीवरती ज्या दिवशी आहे अशा शुभ दिवशी केली जाते

 

⭐चंडीयाग पूजा किती दिवसांची आहे??

ही पूजा एक दिवसाची आहे

 

⭐चंडीयाग विधी

1)आवाहन : या पूजेची सुरुवात गणपती पासून केली जाते नंतरुन विविध प्रकारच्या देवी देवतेंच्या आवाहन केल जाते

2)ह्या पूजेमध्ये सप्तशती पाठाचे हवन करने गरजेच आहे

3) यामध्ये कुंकुम अर्चन सुद्धा केले जाते

4) कुलस्वामिनीची स्थापना केली जाते

5) कुलस्वामिनी ला विविध प्रकारे महापूजन केले जाते

6) देवीला विशेष आवाहन देऊन तिची आराधना केली जाते

7) यामध्ये नवग्रह हवन कुलस्वामिनी हवन असे विविध प्रकारचे हवन केले जाते

8) पूर्णाहुती,आरती ,नैवेद्य अशी पूजा करून पूजेची सांगता होते

 

⭐⭐⭐चंडीयाग अशा प्रकारच्या यज्ञांसाठी जाणकार तज्ञ गुरुजी यांची आवश्यकता आहे

 

⭐चंडीयाग  केल्याने साधकाला देवीचे अखंड कृपाआशीर्वाद प्राप्त होतात जीवनाचे सार्थकता होते जीवन मंगलमय होते हा याग नियमितपणे केला तर जीवनाच्या साधकातील सर्व अडचणी दूर होऊन देवी प्रसन्न होऊन त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करते आणि त्यांना जीवनामध्ये यशकीर्ती प्राप्त करून देते

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Chandi Yag / चंडीयाग”

Your email address will not be published. Required fields are marked *