Description
नवचंडी ची पूजा का करावी ??
लग्न, बिजनेस, व्यापार, नोकरी, नवग्रहांचे दोष ,घरामध्ये कलह, मतभिन्नता ,प्रेमभावना, मित्र भावना यांची कमतरता , वास्तुशुद्धी, वास्तुदोष,राजकारणामध्ये अपयश अशा विविध समस्यांवरती नवचंडी ची पूजा खुप फायदेशीर ठरते
यासाठी नवचंडी पूजा करतात .
या पूजेला दुर्गा पुजा असं सुद्धा म्हणतात
नवचंडी पूजा काय आहे?
नवचंडी पुजा ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची पूजा आहे जी देवी कुलस्वामिनीला समर्पित असते.नवचंडी ची पूजा ही पूजा विशेषतः देवी दुर्गा किंवा देवी कुलस्वामिनीच्या आशीर्वादासाठी केली जाते. नवचंडी पूजा मध्ये दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन केले जाते.
नवचंडी पूजेची किंमत किती आहे ??
नवचंडी पुजेची किंमत विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की पूजेचे स्थान,शास्रोक्त पद्धतीने पूजा , पुरोहितांची संख्या, आवश्यक वस्तु आणि सामग्री, आणि इतर खर्च. सामान्यतः, ही पूजा साधारणतः ₹ 25000 ते 75,000 खर्च येते. अधिक माहिती आणि अचूक किंमत जाणून घेण्यासाठी आमच्या तज्ञ पुरोहितांसोबत संपर्क साधावा.
नव चंडी यज्ञ
नव चंडी याग
नव चंडी पाठ
नवचंडी पुजा
नव चंडी पूजा
नवचंडी पूजेचे फायदे
- ही पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात येणारे अडथळे आणि समस्या दूर करण्यास खूप मदत होते
- नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आणि शत्रूंपासून रक्षण होण्यास मदत होते
- जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते
- दीर्घ आजारांपासून आराम देते जीवन निरोगी करण्यास मदत होते
नवचंडी ची पूजा कुठे करावी??
नवचंडी ची पुजा आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये ,बिल्डिंग अपार्टमेंट मध्ये व सामुदायिक ठिकाणी ही पूजा केली जाते
नवचंडी ची पूजा किती दिवसांची असते ??
नवचंडी ची पूजा ही तीन दिवसांची
आहे
नव चंडी या पूजेमध्ये गणपती पूजन कलश पूजन अशी पूजा केली जाते
✓नंतरुन मातृका पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते.
✓नंतरुन आपल्या आयुष्याचे वृद्धी होण्यासाठी आयुष्य मंत्र जप ही पूजा गुरुजी करतात .
✓नांदी श्राद्ध ही पूजा पूर्वजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते पूर्वजांचे स्मरण या पूजेमध्ये केलं जातं
✓आचार्च आदी वर्णन अशी पूजा आलेल्या गुरुजींसाठी केली जाते
✓दिग्रक्षण दाही दिशांची पूजा केली जाते दाही दिशेने वरून आपला रक्षण होण्यासाठी
✓पंचगव्य करण जागेची शुद्धी करण्यासाठी ही पूजा करतात
✓ पंचभुसंस्कार ही पूजा यज्ञकुंडा वरती असते
✓वास्तुमंडल घराच्या सुख शांतीसाठी हे पूजन करतात
✓ योगिनी मंडल यामध्ये श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचे पूजन केले जाते
✓क्षेत्रपाल मंडल आपल्या जागेचं रक्षण करणारे देवता म्हणून पूजा केली जाते
✓भैरव मंडल यज्ञसंरक्षक देवता म्हणून पूजा केली जाते
✓सर्वतोभद्र मंडल कुलस्वामिनी च्या आवाहनासाठी ही पूजा केली जाते
✓नवग्रह पूजन नवग्रहांच्या आशीर्वादासाठी ही पूजा केली जाते
✓रुद्रपूजन महादेवांचे पूजा केली जाते
✓यामध्ये देवीचे सप्तशतीचे पाठ वाचन केले जाते या सप्तशतीचा पाठामध्ये एकूण 700 श्लोक आहे
✓या पूजेमध्ये कुंकुमार्चन, हरिद्रा अर्चन,हिरण्य अर्चन, असे विधी केले जातात.
✓नंतरुन अग्नि मंथन केले जाते .
त्याचबरोबर नवग्रह हवन केले जाते प्रधान हवन केले जाते सप्तशतीचे हवन केले जाते यामध्ये उत्तरांग पूजन करून पूर्णहुती अशी पूजा करून कुमारिकेची पूजा केली जाते कुलस्वामिनीच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते
नवचंडी हवन
नवचंडी हवन हे नवचंडी पूजेचा एक भाग आहे ज्यामध्ये अग्निमध्ये विशेष आहुती दिल्या जातात. हवनामुळे वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
नवचंडी यज्ञ घरी कसा करावा?
पुरोहितांची निवड: अनुभवी पुरोहित निवडा जे नवचंडी पूजा आणि यज्ञ करण्यास समर्थ असतील.
साहित्य आणि सामग्री: पूजा साहित्यामध्ये देवीचे मूर्ती किंवा चित्र, फल, फूल, नैवेद्य, अग्निकुंड, सप्तशती पाठाचे पुस्तक, आणि आवश्यक हवन सामग्री यांचा समावेश असतो.
पूजा विधी: पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पूजा विधी पूर्ण करा. ध्यान आणि मंत्रोच्चार करून पूजा संपन्न करा.
आहुती: अग्निकुंडात आहुती देऊन हवन पूर्ण करा.
ही पूजा कधी करावी??
शास्त्रानुसार नवचंडी ची पूजा अष्टमी, नवमी ,चतुर्दशी, मंगळवार ,शुक्रवार ,अशा शुभमुहूर्ता वरती करावी
नव चंडी यज्ञाची अधिक माहितीसाठी संपर्क करा
 
								 
								 
								












 
		 
		 
		 
								 
								 
											 
															 
															 
															 
								
Reviews
There are no reviews yet.